“वोग स्टार मिसेस इंडिया” या स्पर्धेत फलटण च्या काजल भोईटे यांचे उत्तुंग यश

फोटो -काजल ऋतुराज भोईटे

फलटण प्रतिनिधी – वोग स्टार मिसेस इंडिया २०२३ च्या प्रतिस्पर्धेत काजल ऋतुराज भोइटे यांनी  प्रवेश केला होता,दरम्यान ही एक सौंदर्य प्रतियोगिता असून ज्यात सारे भारतातील प्रतिभावंतांपासून उभारलेल्या स्त्रीत्वाच्या प्रतिभावंतांना मान्यता मिळते,या स्पर्धेत काजल भोईटे या विजयी झाल्या असून त्यांच्या या यशाने फलटण सह भोईटे घराण्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

ही स्पर्धा जयपूर, राजस्थान येथे पार पडली,  यांच्या सातारा जिल्ह्याच्या प्रतिनिधित्वाखाली त्यांनी या स्पर्धेत प्रवेश केला आणि काजल ऋतुराज भोईटे या पहिल्या पंधरा मध्ये निवडल्या गेल्या होत्या.

 या प्रतिस्पर्धेत 800 प्रतिस्पर्धक मधुन 180 स्पर्धकांची निवड झाली असुन काजल भोईटे यांनी त्यांची सजगता आणि उत्कृष्ट कौशल्यांची दृष्टी घेत मीसेस महाराष्ट्र  विजेत्या ठरल्या आहेत. 

अंतिम फेरी जयपूर, राजस्थान येथे झाली यामध्ये काजल भोईटे यांना त्यांच्या स्फूर्तीने आणि उत्कृष्ट कौशल्यांसह शुभेच्छा देत  त्यांच्यासाठी यश आणि भविष्यात समृद्धी येवो असे अनेकांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

About the Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these